Thursday, 30 June 2016

अन्नावरचा भारतीय संस्कार !!! तांदळाचा भात बनवताना संस्कार महत्वाचा !

अन्नावरचा भारतीय संस्कार !!!

तांदळाचा भात बनवताना संस्कार महत्वाचा !

कुकरमधे भात बनवला, तर त्यात  चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना !

तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला पंधरा ते वीस मिनीट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जिवंत रहातील ?

एका बाजूने गॅस वाचेल, त्यापेक्षा जास्ती रक्कम डाॅक्टरना कायमस्वरूपी द्यावी लागते. अग्निसंस्कार चुकीचा झाला ना !

कसा ?

आपली भात करण्याची पारंपारीक पद्धत काय आहे ? त्यातील तापमान  अभ्यासूया.

प्रथम तांदळाच्या १६ पट पाणी,  १०० सेंटीग्रेडला ऊकळवून घेतले, आधीच रोवळीमधे धुवुन घेतलेले तांदुळ त्यात ओतले, आठ ते दहा मिनिटे उकळत्या पाण्यात तांदुळ शिजवून, एक शीत काढून आतपर्यंत शिजला हे पाहून, जास्तीचे पाणी काढण्यासाठी, चाळणीवर हा भात ओतावा. शिजलेले पाणी, म्हणजे पेज, काढून टाकावी. आणि भात पुनः पातेल्यात ओतून फक्त ५० ते ६० सेंटीग्रेडला दहा मिनिटे झाकण टाकून ठेवावा. मस्त फुलतो.
वेगळी केलेली पेज प्यायची हं. पोषक अंश ( आजच्या भाषेत, कार्बोहायड्रेटस् ) त्याच्यातच आहेत ना !

आता या पद्धतीच्या भातात भात आणि पेज मिळून सगळी जीवनसत्वे शाबूत असतील ना !

अग्नीचा संस्कार यथायोग्य झाल्याने, आणि पाणी काढून टाकल्याने, भात पचायला हलका. आणि पेजही पचायला हलकी.

तांदळाच्या १६ पट पाणी, ८ पट पाणी, ४ पट पाणी आणि दुप्पट पाणी घालून केलेल्या भाताला अनुक्रमे मंड, पेया, विलेपी आणि ओदन अशी नावे आहेत. म्हणजेच निवळ, पेज, आटवल आणि भात.

अशा पेज काढलेल्या भाताने पोट अजिबात सुटत नाही. आणि ( क्लेद वाढवणारा चिकट भाग योग्य वेळी वेगळा केल्याने, साखरही वाढत नाही.)
कोकणात सगळेच जण हाऽऽ एवढाऽऽऽ भात जेवतात. कोणाचे पोट सुटलेले नाही बघितलेले.

पण कुकरचा भात सुरू केल्यापासून पोटं सुटायला लागलीत. आणि रक्तातील साखर देखील वाढायला लागली. हे पण दिसायला लागलेय.

आता सांगा, कुकरच्या भातात आणि पेज काढून केलेल्या भातात जमिन अस्मानाचा फरक असेल की नाही ?

हा आहे अन्नावरच्या अग्नीचा भारतीय संस्कार.

1 comment: